शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी ऑनलाइन बाजारपेठ

ई-शेतकरी विषयी थोडक्यात माहिती ...

स्थापना २०२०

महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या मुलाने ही वेबसाइट बनवली आहे. या शेतकरी पुत्राने आपल्या वडिलांना शेतीकामात करावे लागणारे कष्ट जवळून अनुभवले होते. तीच गोष्ट लक्षात घेऊन त्याने शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्टया कशी मदत होऊ शकते. यावर विचार केला आणि आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ई-शेतकरी वेबसाइटची निर्मिती केली आहे .

शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच बाजारपेठांच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून ई-शेतकरी वेबसाईट उपलब्ध करुन दिली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना आपला शेतमाल घरबसल्या विकता येऊ शकतो आणि कोणत्या मालाचा बाजारभाव काय आहे याची घरबसल्या माहिती घेता यावी या उद्देशाने ई-शेतकरीचा शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे.

या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची माहिती व्यापाऱ्यांना सहज रित्या पाहता येणार आहे. तसेच जिल्हा, तालुका निवडून शेतमाल निवडणे आणि थेट शेतकऱ्यांशी संवाद साधुन खरेदी करणे ही सोपी पद्धत उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे.

शेतकरी बांधवांना आपल्या उत्पादनाला चांगली किंमत मिळावी आणि त्यांना आपले पिक विकण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी ई-शेतकरी ही एक बाजारपेठ आहे. या नवीन बाजारपेठमुळे शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये विना-अडथळा, मुक्त व्यापार करणे शक्य होईल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना आपले उत्पादन राज्याच्या कोणत्याही भागात, कानाकोप-यात पोहोचवणे शक्य होणार आहे.

धन्यवाद.

उद्दिष्ट

संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍यांना थेट ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, जेणेकरून त्यांना त्यांच्या उत्पादनास अधिक चांगले मूल्य प्रदान होईल आणि त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल.

ध्येय

संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना सशक्त, सबळ आणि आत्मनिर्भर बनवणे आणि पुन्हा एकदा बळीराजाचे राज्य आणणे.

ई-शेतकरी परिवारामध्ये सहभागी व्हा

© Eshetkari 2020 - All rights reserved.